प्रविण शांताराम

प्रविण शांताराम

प्रविण शांताराम हे एक मराठी फ्रीलान्सिंग क्षेत्रात काम करणारे असून ते मराठी, हिंदी भाषेत लिहितात.

ते भाषांतर, संपादन, प्रुफरीडिंग, ऑडीओ बुक पब्लिशिंग, ई-बुक पब्लिशिंग, कंटेंट रायटिंग, पीडीएफ प्रोसेसिंग या क्षेत्रात काम करतात. आतापर्यंत फ्रीलान्सिंगच्या अनेक वेबसाईटवर त्यांनी विविध देशातील क्लायंट सोबत काम केले आहे. आणि त्यांच्या कामांना क्लायंटनी चांगला प्रतिसाद दिला आहे. भाषांतर करतांना त्यांनी सर्व प्रकारचे विषय हाताळले असून ज्यामध्ये प्रामुख्याने वेबसाईट भाषांतर, भाषा लोकलायजेशन, कायदेशीर, शैक्षणिक, तांत्रिक, प्रशिक्षण, सामान्य, साहित्य, उत्पादन प्रक्रिया, बँकिंग, विमा, सहकार, पर्यावरण, औद्योगिक सुरक्षा, मोबाईल अॅप, कॉम्पुटर प्रोग्रॅम, अभियांत्रिकी, ई-बुक इत्यादी विषयांच्या संदर्भात भाषांतर केले आहे. 

त्यांनी अनेक कॉर्पोरेट जगातील नामवंत कंपन्या, बँका, स्वायत्त संस्था, सहकारी बँका, शैक्षणिक संस्था, अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या, मोबाईल कंपन्या यांच्यासाठी भाषांतर केले आहे. वाचक आणि श्रोता यांना आपले भाषांतर व्यवस्थित कळावे म्हणून ते 'सामग्रीचा प्रकार' म्हणजेच डोमेन ओळखून सुगम मराठीत त्याचे भाषांतर करतात. 

ई-बुक पब्लिशिंग - ई-बुक डिझाईन करणे आणि ते प्रकाशित करणे, या क्षेत्रात सुद्धा ते काम करतात आणि त्यांनी आतापर्यंत अनेक लेखकांना त्यांचे पुस्तक प्रकाशित करण्यास मदत केली आहे. 

ऑडीओ बुक पब्लिशिंग - ऑडीओ बुक पब्लिशिंग क्षेत्रात काम करत असतांना त्यांनी आतापर्यंत मराठीत अनेक ऑडीओ बुक तयार केली आहेत. त्यासाठी लागणारे तंत्र, आवाज कलाकार यांचे व्यवस्थापन करण्यासाठी लागणारा अनुभव त्यांच्याकडे आहे.

ट्रान्सस्क्रीप्शन - मराठी आणि हिंदी भाषेत ऑडीओ  ट्रान्सस्क्रीप्शन आणि संपादनाचा त्यांना अनुभव असून त्यांनी ऑडीओ  ट्रान्सस्क्रीप्शन साठी १०० तासांपेक्षा जास्त काम केले आहे.

पीडीएफ प्रोसेसिंग - पीडीएफ मधून शब्द म्हणजेच टेक्स्ट बाजूला काढणे, पीडीएफ बॅच प्रोसेसिंग इत्यादी कामांचा त्यांना अनुभव असून याप्रकारची अनेक कामे त्यांनी केली आहेत. 

कायदेशीर प्रमाणपत्र भाषांतर- त्यांनी अनेक प्रकारची  प्रमाणपत्रे जसे जन्म, मृत्यू, विवाह, जमीन ७/१२, सेल डीड, मृत्यूपत्र इत्यादी प्रमाणपत्रांचे मराठी आणि हिंदी भाषांतर केले आहे. 


त्यांना लिखाण करणे नेहमीच आवडते. या आपल्या छंदातून त्यांनी  अॅमेझॉन किंडलवर ५ मराठी, १ हिंदी आणि १ इंग्रजी ई-बुक प्रकाशित केली आहेत. यातील काही ई-बुक त्यांनी ऑडीओ बुक स्वरुपात अॅमेझॉन ऑडीबल, स्टोरीटेल या मंचावर प्रसिद्ध केली आहेत. 

स्वतः एक यांत्रिकी अभियंता असल्याने त्यांना तांत्रिक स्वरूपाचे भाषांतर करणे आवडते. त्यांनी अनेक उत्पादन कंपन्या आणि त्यांचे उत्पादन माहितीपुस्तक (ब्रोशर) साठी आपले योगदान दिले आहे. त्यांना आपल्याकडील ज्ञान सतत सामाईक करायला आवडते. प्रत्येक वर्षी ते किमान एका फ्रीलान्सरला अजून चांगले काम करण्यासाठी प्रवृत्त करतात. त्यांना कौशल्यवाढीसाठी मार्गदर्शन आणि स्त्रोत पुरवितात. प्रविण शांताराम यांनी यंत्र अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजीनिअरिंग) मध्ये पदवी प्राप्त केली असून ते इंटर्नल ऑडीटर आहेत.

त्यांची अपवर्क प्रोफाईल लिंक - upwork